बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (09:13 IST)

भाजप नेत्याच्या मुलाचा अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

child death
छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजप नेते धीरज सिंगदेव यांच्या मुलाचा मंगळवारी रात्री वसुंधरा विहार कॉलनीत भीषण अपघात झाला. तसेच या अपघात कारने चिरडल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला.   
धीरज सिंहदेव काल रात्री वसुंधरा विहारमध्ये आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सहा वर्षीय मुलगा स्वतंत्र सिंहदेवसोबत आले होते. स्वतंत्र रात्री दहाच्या सुमारास घराबाहेर पडला. व घटनास्थळी एक महिला मुलासोबत बॅडमिंटन खेळत होती. स्वतंत्र सिंहदेव त्याच्या जवळ बसला होता. 
 
हा अपघात परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कार चालकाने मुलावर गाडी घातली नंतर तिथून फरार झाला. स्वतंत्र सिंगदेव या लहान मुलाला तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले असता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.