1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराविरोधात तक्रार

kushagra sagar
बरेली येथील भाजप आमदारावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप झाला आहे. पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. बिसौलीचे भाजप आमदार कुशागारा सागर यांनी २०१४ साली लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. मुलीची आई भाजप आमदाराकडे घरकामासाठी जात असताना तीही आईसोबत जात असे. तेव्हा सागर याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयात तिच्यावर बलात्कार केले, असे तरुणीने पोलीसांना सांगितले.
 
त्याविरोधात बारादारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून आमदार कुशागारा सागर याच्या वडिलांनी तुम्हा दोघांचे लग्न लावून देतो असे वचन दिले आणि कारवाई होऊ दिली नाही मात्र आता सागर दुसर्‍या तरुणीशी लग्न करणार आणि मुलीला न्याय मिळाला नाही तर तिने आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे.