Widgets Magazine
Widgets Magazine

भाजपामधील बाटगेच मोदी-मोदी करतात : सामना

shivsena bjp
Last Modified शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:19 IST)

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून

Widgets Magazine
पुन्हा एकदा
भाजपावर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगले होते. यावेळी भाजपाकडून मोदी-मोदी तर, शिवसेनेकडून ‘चोर है-चोर है’ या घोषणा दिल्या होत्या. त्याच मुद्यावरुन टीका केली आहे.

मोदींच्या नावाने उन्माद करण्याची गरज नसल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. भाडोत्री बाटग्यांच्या भरवशावर लढता येणार नाही. भाजपामधले बाटगेच मोदी-मोदी करतात असे अग्रलेखात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोले मारण्यात आले असून, घोषणा युद्धात शिवसेनेची काही चूक नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अरेला कारे करण्याचा शिवरायांचा धर्म आम्ही पाळला असे अग्रलेखात लिहीले आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :