शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपने मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध केले

गोव्यानंतर भाजपने मणिपूरमध्येही बहुमत सिद्ध केले आहे. 60 सदस्य संख्या असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला 33 सदस्यांनी पाठिंबा दिला. भाजपचे यमनम खेमचंद यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे एन,बिरेन सिंह यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झाले आहे. एक अपक्ष आणि तृणमूल कॉंग्रेसच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला.
 
मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर एनपीपी 4, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी एक आणि कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिले आहे.त्यामुळे पाच राज्यांच्या निकाल लागल्यानंतर चार राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे.