शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (15:05 IST)

काळविटाचा मृत्यू नैसर्गिक: सलमान

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान आज जोधपूर कोर्टात हजर झाला. तिथे त्याने काळविटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे सांगितले.
 
जोधपूर न्यायालयात सलमानला जवळपास 65 प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान सलमानने काळविटाचा शिकार केल्याचा आरोप फेटाळला आणि म्हणाला ही घटना घडली असताना मी हॉटेलमध्ये होतो आणि मला याबद्दल काहीही कल्पना नाही.
 
या दरम्यान सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी या देखील उपस्थित होत्या. सर्वांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले.
 
सलमान जवळपास एक तास कोर्टात उपस्थित होते. कोर्टाबाहेर सकाळपासून चाहत्यांची गर्दी जमलेली होती.