1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (00:45 IST)

खासदार प्रज्वल यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी

लैंगिक शोषण प्रकरणात कर्नाटकातील हसनमधून लोकसभेचे उमेदवार आणि जेडीएस नेते प्रज्ज्वल रेवन्ना वादात सापडले आहेत.प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. रेवन्ना सध्या भारताच्या बाहेर आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात आहे. प्रज्वल ला भारतात परत कसे आणायचे याचा तपास करण्यासाठी स्थापित केलेले विशेष तपास पथक ठरवणार. लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वलला ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. 

ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे काय आहे 
आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्था एखाद्या गुन्ह्याचा संबंधात एखाद्या व्यक्तीची ओळख, ठिकाणाची माहिती गोळा करण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी करते. 
या साठी तपास यंत्रणेला नोटीस साठी इंटरपोलला विंनती करावी लागते. इंटरपोल वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कॉर्नर नोटीस जारी करते. 

हसन लोकसभा मतदारसंघातील जेडीएस-भाजप युतीचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे पुतणे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे प्रज्वलची माहिती असून देखील भाजपने जेडीएस शी युती का केली असा सवाल काँग्रेसने केला आहे. 

33 वर्षीय प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत आणि याशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शेकडो अश्लील व्हिडिओ बनवल्याचाही आरोप रेवन्नावर आहे. याप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit