दिल्ली: लाल किल्ला आणि जामा मशीद बॉम्बने उडवण्याची धमकी
Delhi News: दिल्लीच्या लाल किल्ला आणि जामा मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ९.०३ वाजता, स्मारक संकुलात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आणि दिल्ली अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ते म्हणाले, आम्ही घटनास्थळी अग्निशमन दलाचे इंजिन पाठवले आणि तिथे कसून शोध घेतला. तसेच, चौकशीनंतर ती धमकी खोटी असल्याचे आढळून आले.
दिल्ली अग्निशमन सेवेच्या (डीएफएस) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ९.०३ वाजता स्मारक संकुलात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आणि पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही. दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, माहिती मिळताच, बॉम्ब निकामी पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिसांनी सांगितले की ही खोटी माहिती होती.
Edited By- Dhanashri Naik