गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (19:30 IST)

प्रेयसीला गिफ्ट म्हणून होम थिएटरमधून पाठवला बॉम्ब, स्फोटात नवरा मुलगा मृत्यूमुखी

The gift itself proved fatal  Bomb sent from home theater The name of the accused is Sarju Markam in Kabirdham district of Chhattisgarh
लग्नात गिफ्ट म्हणून होम थिएटर मिळालं, पण ही भेटवस्तूच जीवघेणी ठरली. या होम थिएटरचा स्फोट झाला आणि नवरा मुलगा तसंच त्याच्या भावाचा त्यामध्ये मृत्यू झाला. छत्तीसगढ मधल्या कबीरधाम जिल्ह्यात 3 एप्रिलला ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गिफ्टमध्ये बॉम्ब होता. जेव्हा होम थिएटरचा प्लग जोडला तेव्हा त्याचा स्फोट झाला. या स्फोटात नवरा मुलगा जागीच मृत्यूमुखी पडला, तर त्याच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटात दीड वर्षांचं लहान मुलही जखमी झालं.
 
हा बॉम्ब वधूच्या माजी प्रियकराने पाठवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न होत असल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं.
 
सरजू मारकम असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याला मंगळवारी (4 एप्रिल) अटक करण्यात आली. पण त्याने अजूनपर्यंत जबाब दिला नाही.
 
पोलिसांनी म्हटलं, सरजू मारकम (33 वर्षे) याचे या 29 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्याशी लग्न करून आपली दुसरी बायको म्हणून राहावं यासाठी तो दबाव आणत होता.
 
पण मुलीच्या कुटुंबाने नकार दिला आणि तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं.पोलिसांनी म्हटलं की, हा स्फोट इतका मोठा होता की, खोलीचं छप्पर आणि भिंतही हादऱ्याने कोसळली.

Published By- Priya Dixit