बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 30 एप्रिल 2024 (10:43 IST)

भोपाळ, जयपुर, चंदीगड, वाराणसी, श्रीनगर एयरपोर्टला मिळाली बाँबस्फोट करण्याची धमकी

कोलकत्ता आणि जयपूर एयरपोर्टला देखील दोन दिवसांपूर्वी मिळाली धमकी. राजभोज इंटरनॅशनल एयरपोर्टला इमेल वरून बॉंबने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एयरपोर्ट डायरेकटर रामजी अवस्थी यांना आलेल्या या धमकीच्या इमेल नंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 
 
डायरेकटर रामजी अवस्थी यांना आलेल्या इमेल नंतर सुरक्षा मैन्युअल लागू करून सर्व एंट्री व एग्जिट पॉइंटला सील करून तपास सूर आहे. या इमेल मध्ये देशातील अन्य एयरपोर्टला देखील बॉंबने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 24 तासांसाठी  अलर्ट केले गेले आहे. पोलिसांना शंका आहे की, अज्ञात ईमेल दहशत पसरवण्यासाठी पाठवले गेले आहे. दोन दिवसांपूर्वी कोलकाता, जयपुर सोबत देशातील अनेक एयरपोर्टला असेच इमेल आले होते. तसेच मेल पाठवणाऱ्यांनी एयरक्राफ्ट मध्ये बॉंब असल्याची माहिती दिली होती. भोपाळ सोबत   जयपुर, चंदीगड, वाराणसी, श्रीनगर सोबत इतर देखील एयरपोर्ट सहभागी हे. पोलीस आणि साइबर एजेंसी आलेल्या मेल ची चौकशी करून शोध घेत आहे की हा मेल कुठून आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik