मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (11:17 IST)

दहावीची नवी पाठ्यपुस्तके महाग

दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून ही नवी पाठ्यपुस्तके महाग आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तकांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही पुस्तके आता बालभारतीच्या भांडारात उपलब्ध झाली आहेत.
 
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार दहावीच्या अभ्यासक्रमात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बदल झाला आहे. नववीचा अभ्यासक्रम गेल्या वर्षी बदलला. विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंअध्ययनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यापूर्वी एक पुस्तक होते. आता या पुस्तकाचे दोन भाग झाले आहेत. तसेच बीजगणित, भूमिती याऐवजी गणित भाग १ आणि गणित भाग २ अशी दोन पुस्तके आहेत. माध्यमनिहाय एक संच खरेदी करण्यासाठी जवळपास साडेसहाशे रुपये लागणार आहेत. पाठय़पुस्तकांच्या किमती १० ते १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुस्तकांचा वाढलेला आकार, पुस्तक छपाईसाठी वापरलेले चार कलर, कागदाच्या वाढलेल्या किमती, ट्रान्स्पोर्ट यामुळे हे दर वाढल्याचे बालभारतीने स्पष्ट केले आहे.