रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (19:25 IST)

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर

कोरोनाने देशभरात थैमान मांडले आहे आणि अशात प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून यामुळे अनेक लोकांच्या भेटीगाठी होऊ शकत नाहीये. अशात प्रेमी जोडप्यांना भेटणे तरी अजूनच कठिण होऊन बसले आहे. परंतू जेव्हा प्रेयसीला भेटल्याशिवाय राहवं गेलं नाही तेव्हा एका तरुणाने भेटण्यासाठी शक्कल लढवली. 
 
गुजरातच्या वलसाडमध्ये या तरूणानं आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलीचा ड्रेस घातला पण त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. 19 वर्षीय मुलाला वाटले की रात्री पोलिस मुलींची चौकशी करत नाही म्हणून त्याने पंजाबी ड्रेस घातला आणि ओढणी डोक्यावर घेऊन रात्री तीन वाजेच्या सुमारास बाहेर पडला. रात्री गस्त घालताना पोलिसांना त्याला पाहिलं. तेव्हा तोंड लपवत असलेल्या तरुणाने पोलिसांना काही उत्तर दिले नाही तेव्हा त्याची पोलखोल झाली. 
 
ओढणी काढल्यानंतर हा मुलगा असल्याचं पाहून पोलीस कर्मचारीही चक्रावले. या घटनेनंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.