तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

love burn
Last Modified मंगळवार, 2 जून 2020 (16:51 IST)
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील फत्तरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भुजैनी गावात घडला आहे. यात गावात दाखल झालेल्या पोलिसांना गावातील गुंडांनी अक्षरशः पिटाळून लावले. गावातील गुंडांनी पोलिसांची वाहनंही जाळून टाकली आणि पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले.
भुजैनी गावातील एका आंब्याच्या बागेत तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आणि गावात धुमश्चक्री सुरु झाली. जाळून हत्या झालेल्या तरुणाचे शेजारच्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही लग्न करण्याच्या विचारात होते, पण घरच्यांचा त्याला विरोध होता. गावातील ही तरुणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन कानपूरला गेली. त्यानंतर या तरुणाने तिच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
तरुणाने तरुणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तरुणीचे वडील संतप्त झाले आणि तरुणाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. तरुणाला अटक करण्यात आली होती. पण कोरोना व्हायरसच्या साथीमुळे तो १ मे रोजी जामिनावर सुटून गावात आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी हा तरुण घरातून निघाला, तो संध्याकाळपर्यंत घरी परतलाच नाही. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली, तेव्हा त्याचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या तरुणाचे हातपाय बांधून झाडाला बांधले आणि पेटवून देऊन जीवंत जाळले, अशी माहिती पुढे आली आहे.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

भारतीय लष्करी अधिकारी, जवानांना 89 अॅणप्स तत्काळ काढून ...

भारतीय लष्करी अधिकारी, जवानांना 89 अॅणप्स तत्काळ काढून टाकण्याचा आदेश
सध्या चीनसोबत वाढलेला तणाव आणि गोपनीय माहितीच्या सुरक्षावरून काही समस्या निर्माण होत ...

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१७ विमानातून ३२ हजार ८२३ प्रवासी ...

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१७ विमानातून ३२ हजार ८२३ प्रवासी मुंबईत
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१७ विमानांनी ३२ हजार ८२३ नागरिक मुंबईत दाखल झाले ...

पोलिस चकमकीत गँगस्टर विकास दुबे ठार

पोलिस चकमकीत गँगस्टर विकास दुबे ठार
कानपुरामधील भौती भागात शुक्रवारी पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत 8 पोलिसांच्या ...

युजीसीकडून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती ...

युजीसीकडून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता ...

कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची ...

कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
“मला आशा आहे की कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचं उत्पादन आणि विकासात भारताची महत्त्वपूर्ण ...