बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बस दरीत कोसळून अपघात, २० ठार, १३ जखमी

जम्मू कश्मीरमधील रामबान जिल्ह्यातील केला मोठ येथील राष्ट्रीय महामार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २० जण ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. 

 बनिहाल येथून रामबान जिल्ह्याला जाणाऱ्या या बसमध्ये पस्तीसहून अधिक प्रवासी होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये भरल्याने बस चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस २०० फुट दरीत कोसळली.  जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जम्मू कश्मीरच्या राज्यपालांनी मृतांच्या नातवाईकांना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.