शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (11:05 IST)

'त्या' विधानामुळे कलबुर्गी यांची हत्या, संशयीताचा खुलासा

कन्नड विचारवंत आणि लेखक एम.एम.कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली असे या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांना सांगतिले. कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक सीआयडीने दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोघांपैकी गणेश मिसकिन (२७) या आरोपीने कलबुर्गी यांनी मूर्तीपूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले. ३० ऑगस्ट २०१५ रोजी उत्तर कर्नाटकात धारवाड येथे रहात्या घराबाहरे कलबुर्गी यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.
 
जून २०१४ मध्ये अंधश्रद्धा विरोधी विधेयकावर चर्चा सुरु असताना कलबुर्गी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर.अनंतमूर्ती यांचा संदर्भ देऊन मूर्तीपूजेसंबंधी आक्षेपार्ह विधान केले होते. त्या वक्तव्यामुळे कलबुर्गी यांना हिंदू विरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे गणेशने कर्नाटक सीआयडीला सांगितले.