बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (16:32 IST)

फोटो शूट साठी मॉडेलला बोलवून लॉज मध्ये सामूहिक बलात्कार केला

केरळमध्ये एका मॉडेलवर तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. कोची येथे फोटोशूटसाठी आलेल्या मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने आरोप केला आहे की ती एका लॉजवर राहिली होती, जिथे चार जणांनी गुंगीचे औषध पेय पदार्थात मिसळले, तिला पाजले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेने तक्रार केली आहे की, आरोपीने 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आणि त्याचा वापर पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी केला. हा व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सलीम कुमार (33) याला अटक करण्यात आली असून अजमल आणि शमीर या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे, 
पोलिसांनी सांगितले की, मलप्पुरममधील रहिवासी असलेल्या पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ती फोटोशूटसाठी येथे आली होती आणि अलाप्पुझा येथील रहिवासी सलीम कुमार याला ती आधीपासूनच ओळखत असल्याने तिने महिलेची लॉजवर राहण्याची व्यवस्था केली, परंतु नंतर तिघांनी लॉज मालकासह , तिला गुंगीचे औषध मिसळलेले पेय दिले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते इतर आरोपींचा शोध घेत आहेत.