मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:19 IST)

सीबीएसई बोर्ड: टायपींगमधील चुकीमुळे विद्यार्थ्यांना २ गुण

‘सीबीएसई’ बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत बोर्डाने केलेल्या टायपींगमधील चुकीमुळे हक्काचे असे २ गुण नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यंदा सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षा झाल्यानंतर या प्रश्न पत्रिकेत टायपींगच्या चुका असल्याचे विद्यार्थी आणि पालकांनी बोर्डाच्या लक्षात आणून दिले. ही चूक बोर्डाच्या लक्षात आली आणि अखेर विद्यार्थ्यांना २ गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्याचा आनंद झाला आहे.