गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (20:10 IST)

CDS रावत हेलिकॉप्टर क्रॅश:आगीचा गोळा बनलेल्या विमानातून तिघांनी उडी घेतली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले कसे होते दृश्य

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे MI17V5 हेलिकॉप्टर कोसळले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 12 लष्करी अधिकारी विमानात उपस्थित होते. अपघातस्थळी सर्वप्रथम स्थानिकांनी पोहोचून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. साक्षीदारांनी सांगितले की विमान एका झाडावर आदळले आणि तीन जणांनी हेलिकॉप्टरला आग लागण्यापूर्वी उडी मारली.
कुन्नूर येथील लष्करी विमान अपघाताचे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले, "मी पहिल्यांदा मोठा आवाज ऐकला. काय घडले ते पाहण्यासाठी मी बाहेर आलो, तेव्हा हेलिकॉप्टर एका झाडावर आदळल्याचे मला दिसले. आगीचा मोठा गोळा होता. नंतर ते दुसऱ्या झाडावर आदळले. मी दोन-तीन जणांना हेलिकॉप्टरमधून उडी मारताना पाहिले, ते पूर्णपणे भाजले होते आणि हेलिकॉप्टरमधून पडले होते."
ते पुढे म्हणाले, "मी परिसरातील आणखी लोकांना बोलावले आणि विमान अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही ब्लँकेट आणि पाण्याने विमानातील आग विझवण्याचा प्रयत्न केला. आम्ही जखमींना स्ट्रेचरने रस्त्यावर आणत होतो, नंतर याची माहिती अग्निशमन विभाग आणि इतर आपत्कालीन सेवांना देण्यात आली."
आज सकाळी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या MI17V5 विमानाला अपघात झाला. खराब हवामानामुळे हा अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.