Widgets Magazine

भारताने फेटाळला शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप

भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप हा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही. भारतीय सैन्य फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देते. यंदाच्या वर्षात झालेल्या एकूण शस्त्रसंधीच्या उल्लंघनापैकी दोन-तृतीयांश उल्लंघनाच्या घटना या मागील पाच आठवड्यांमधील आहेत,’ असे यांनी म्हटले आहे.
‘पाकिस्तानकडून भारतीय उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला हा आरोप मान्य नाही. आम्ही हा आरोप फेटाळून लावतो. भारतीय दूतावासातील अधिकारी व्यापार आणि अर्थसंबंध यावर दोन देशांमधील संवाद वाढावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे,’ अशी माहिती स्वरुप यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.


यावर अधिक वाचा :