बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:24 IST)

'हे' लोक पण टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकणार

केंद्र सरकारने टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी वाढीव मदत दिली आहे. क्वारंटाईन असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना टपालाद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आली आहे. विधी आणि न्याय मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करुन कंडक्शन ऑफ इलेक्शन रुल्स, १९६१ कायद्यात बदल करण्यात आला आहे.
 
विधी व न्याय विभागाने काढलेल्या पत्रकानुसार कायदा २७ अ, कलम (अअ) मध्ये याआधी फक्त अंपग असलेल्या व्यक्तींनाच टपाल मतदानाची मुभा देण्यात येत होती. आता त्यापुढे नवीन कलम जोडून “कोविड संशयित रुग्ण आणि संसर्ग झालेले रुग्ण” यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच कलम (इ) नुसार ८० वर्षीय नागरिकांना टपाल मतदानाची मुभा होती, त्यात बदल करुन ६५ वर्षावरील नागरिकांनाही टपालाद्वारे मतदान करता येणार आहे.
 
कलम इ नंतर या कायद्यात कलम फ जोडण्यात आले आहे. त्यानुसार “कोविड संशयित रुग्ण आणि संसर्ग झालेले रुग्ण” किंवा कलम (फ १) सरकारी किंवा सरकारमान्य रुग्णालयाने कोविड पॉझिटिव्ह ठरवलेले रुग्ण किंवा (फ २) घरी आणि संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या लोकांना टपाल मतदानाचा पर्याय दिला जाणार आहे.