testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी थेट मोदींना साकडे

चंदीगड-चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे. दोघांच्या पालकांची मनधरणी करण्यासाठी स्वयंसेवक पाठवावेत अशीही विनंती या तरूणाने मोदींना केली आहे. प्रेयसीशी लग्न जुळवून द्यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घालणारं पत्र त्याने पंतप्रदान कार्यालयाला पाठवले आहे.
अशाप्रकारची अनेक गमतीशीर पत्रे येथून पंतप्रधानांच्या कार्यालयात येत असतात. सेंट्रलाइज्ड जनतक्रान निवारण आणि देखरेख यंत्रणेच्या माध्यमातून येणारे 60 टक्के पत्रं गमतीशीर असतात आणि त्यामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गमतीशीर मागण्या केलेल्या असतात. पंतप्रधान कार्यालयाकडे चंदीगडहून दर महिन्याला 400 तक्रारी जातात, यापैकी अनेक तक्रारी वैयक्तिक समस्यांच्या बाबतीत असतात असं येथील एका अधिकार्‍यांने सांगितले.


यावर अधिक वाचा :