शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (21:49 IST)

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शेवटची संधी, पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगाने वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शेवटची संधी दिली आहे. वारंवार चौकशीसाठी आयोगासमोर गैरहजर राहिल्याने आयोगाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मात्र, परमबीर सिंह हे चौकशीसाठी गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने शेवटची संधी दिली असून पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे.
 
चांदीवाल आयोगाकडूम परमबीर सिंग यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट पाठवण्यात आलं होतं. हा अहवाल महाराष्ट्र पोलिसांनी सादर केला. परमबीर यांची तीन घरं असून त्या ठिकाणी त्यांना जामीनपात्र वारंट पाठवलं होतं. या तीनही ठिकाणी परमबीर सिंह मिळाले नाहीत. यावर देशमुख यांच्या वकिल अनिता शेखर कॅस्टिरोल यांनी कायद्यातील तरतुदीनुसार वारंवार बोलावूनही परमबीर हजर राहत नसल्याने त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी आणि अजामीन पात्र वारंट जारी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज न्यायालयाने पुन्हा एकदा शेवटची संधी देत, जामीन पात्र वारंट पाठवण्याचे आदेश दिले आहेत.