Widgets Magazine

चंदू चव्हाण 8 एप्रिलपासून कर्तव्यासाठी सज्ज

पाकच्या तावडीतून सोडवून आणलेला जवान 8 एप्रिल रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होणार आहे. जम्मुमधील लष्काराच्या कार्यलयात हजेरी लावून आपल्या राष्ट्रीय रायफल्स 37 मध्ये रूजू होणार आहे.
सर्जिकल स्ट्राईकनंतर चुकून पाकिस्तानात चंदू चव्हाण गेला होता. त्यानंतर देशात चंदू चव्हाणांची सुटका व्हावी यासाठी मागणी होत होती. नागरिक प्रार्थना करत होते. तर राष्ट्रीय स्तरावर त्याच्या सुटकेसाठी मोठी चर्चा झाली होती. चंदू चव्हाण याची पाकिस्तानातून सुटका झाल्यानंतर तो ऐन होळीच्या दिवशी गावी परतला होता. आता तो परत कर्तव्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे.


यावर अधिक वाचा :