पीडीत कुटुंबियांनी कोणाकडे मदत मागायची – चित्रा वाघ
धुळे जिल्ह्यात १५ वर्षीय मुलीवर जातपंचायत सदस्यांकडून अत्याचार करण्यात आले आणि तिला दिवस गेले असता गर्भपात करण्याची सक्ती केली गेली. पण गर्भपात केला नाही म्हणून जातपंचायतीनं या कुटुंबालाच वाळीत टाकलं. पीडीत कुटुंबियांना पोलिस प्रशासनही मदत करत नाही तर त्यांनी कोणाकडे मदत मागायची असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलाय.
पॉक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करावा, मनोधैर्य योजनेअंतर्गत मुलीला सहाय्य मिळावे, त्याचबरोबर घटनेची दखल न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागण्या चित्रा वाघ यांनी केल्या आहेत.