शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सदरचा स्फोट ओनजीसीचे सागर भूषण हे ड्रिल शिप डागडूजूसाठी कोचीन शिपयार्डमध्ये आणलं होतं. त्याचवेळी पाण्याच्या टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर तिथं आग लागली. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशामक दलाला बोलविण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर निंयत्रण मिळवले आहे.

या घटनेमध्ये जखमी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे.