शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:52 IST)

500 आणि 2000 रुपयांच्या नोटांना रंग लागल्यास बँक नोटा घेणार नाही

Marathi news, Maharashtra news, Marathi samachar, Marathi news portal, Marathi Online News, Marathi Khabar, News in Marathi, Webdunia Marathi News, Latest Marathi news,  national news, international news, sports news, business news, breaking news, Marathi Headlines, Mumbai News, ताज्या बातम्या, मराठी वृत्तपत्र, वृत्त जगत, महाराष्ट्र, मराठी वृत्तपत्रे, ठळक बातम्याहोळी खेळत असताना खिशात असलेल्या कारण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर  रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत. आरबीआयनं क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत ही गाइड लाइन जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर याचे मॅसेजही व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर फिरत असलेले हे मॅसेजमध्ये तथ्य असल्याच्या वृत्ताला बँक अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. आरबीआयकडून ही गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर रंग किंवा पेनानं काही लिहिलं असल्यास त्या नोटा बँकेत जमा करण्यात येणार नाही, अशी माहिती दिल्लीतल्या सेक्टर 16 मधल्या पंजाब अँड सिंड बँकेचे चीफ मॅनेजर अनिल कुमार यांनी दिली आहे.
 
याआधी 500 आणि 1000च्या बंद करण्यात आलेल्या नोटांना रंग लागला असल्यास किंवा त्या नोटांवर पेनानं काही लिहिलं गेल्यास त्या बँकेत चालत होत्या. अनेकदा सण असलेल्या घरात बनवलेल्या पक्वान्नच्या तेल नोटांना लागत होते. मात्र तरीही अशा नोटा बँकेत स्वीकारल्या जात होत्या.