गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 एप्रिल 2018 (17:21 IST)

धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह

धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह होणार आहेत असा मोठा निर्णय धर्मदाय राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी घेतला आहे. मुलींची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकरी आणि गरीब कुटुंबांना असतो त्यातून मार्ग काढण्यासाठी हा मोठा आणि नामी निर्णय घेतला गेला आहे. राज्यभरातील मंदिरांकडे जो निधी जमा झाला आहे, त्या निधीतून सामूहिक विवाह करण्यात येणार आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतून राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत. वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मुलींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याशिवाय शेतमजुर किंवा गरीब कुटुंबातील परिस्थितीही सारखीच आहे.