बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (08:41 IST)

अश्लील चाळे करणाऱ्याला पकडण्यासाठी २५ हजारांचे बक्षीस जाहीर

दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी २५ हजार रुपये बक्षीस  जाहीर केलं आहे.  याप्रकरणात वसंत विहार परिसरात एका चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ७ फेब्रवारी रोजी रुट नंबर ७७४ वर धावणाऱ्या एका बसमध्ये ४०-४५ वयाच्या एका व्यक्तीने विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले होते. आरोपी अश्लील चाळे करतअसल्याचा व्हिडिओही एका विद्यार्थीनीने मोबाईमध्ये बनवला होता. या व्हिडिओत आरोपीचा चेहरा कैद झाला आहे.

या व्हिडिओच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीचा फोटो काढून पोस्टर तयार केले आहेत. हे पोस्टर ठिकठिकाणी चिटकवण्यात आले असून या मार्गावर धावणाऱ्या बसेस, रिक्षा चालकांमध्येही वाटण्यात आले आहेत.हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यानंतरही आरोपीला अद्याप पकडण्यात यश आलेलं नाही.