testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एन्काउंटर केले नसते तर आज मोदी जिवंत नसते: वंजारा यांचा दावा

vanzara
Last Modified मंगळवार, 25 एप्रिल 2017 (11:13 IST)
गुजरातचे माजी भारतीय पोलिस सेवा अधिकारी (आयपीएस) डीजी वंजारा यांनी फर्जी प्रकरणात दावा केला की जर त्यांनी एन्काउंटर केले नसते तर आज वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिवंत दिसले नसते. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आतापर्यंत त्यांनी केलेले कोणतेही एन्काउंटर कायद्याबाहेर नाहीत.
जामिनावर कारागृहात बाहेर पडल्यानंतर माजी आयपीएस ऑफिसर वंजारा आतापर्यंत 56 जनसभा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन चुकले आहेत. या क्रमातच येथे आयोजित सन्मान समारंभात वंजारा यांना 10 रूपयांच्या शिक्क्यांनी तोलण्यात आले.
10 वर्षापूर्वी मला अटक करण्यात आली असून माझ्यावर आरोप करणार्‍यांना मी सांगू इच्छितो की मी एन्काउंटर केले नसते तर आज गुजरात काश्मीर झाला असतं, असे वंजारा यांनी म्हटले. त्यांनी एन्काउंटर केले नसते तर आज पीएम मोदी जिवंत दिसले नसते असा दावा ही केला.


यावर अधिक वाचा :