शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (15:30 IST)

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली-  राष्ट्रीय राजधानी आणि हरियाणा येथील काही भाग आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. राजस्थानसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये धक्के जाणवले. हरियाणाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल होती. 
 
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची इकाई राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार पहाटे 4.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे अनेकांनी टि्वट करून या भूकंपाची माहिती दिली.