शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (21:37 IST)

डेरा प्रमुख राम रहीम हत्येप्रकरणी निर्दोष,पंजाब हरियाणा उच्च न्यायालया ने निर्णय दिला

ram rahim
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने डेरा प्रमुखासह अन्य चौघांची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे. रणजित सिंग हत्या प्रकरणात पाच ही आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली आहे. 

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करत हा निर्णय दिला. राम रहीम यांना 2019 मध्ये सीबीआय कोर्टाने बलात्कार आणि इतर दोन खुनांमध्ये दोषी ठरवले होते. नंतर 18 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने राम रहीम आणि इतरांना रणजित सिंह हत्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
  
अवतार सिंग, कृष्णलाल, जसबीर सिंग आणि सबदिल सिंग हे या प्रकरणातील इतर आरोपी आहेत. त्याचवेळी खटल्यादरम्यानच एका आरोपीचा मृत्यू झाला.  

2002 मध्ये डेराच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजित सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.रणजित सिंग यांच्या मुलाने 2003 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि 2021 मध्ये राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

पत्रकारावर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी राम रहीमचे अपील अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे. 
गुरमीत राम रहीम आपल्या दोन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.  
 
Edited by - Priya Dixit