गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (10:00 IST)

लग्नात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

death
अलीकडील हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. काहींचा कार चालवताना मृत्यू होत आहे तर काहींना नाचताना हृदयविकाराचा झटका आला आहे. वाराणसीच्या चेतगंज पोलीस ठाण्याच्या पिपलानी कटरामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.
 
वाराणसीच्या पिपलानी कटरा अवघडनाथ ताकिया येथील मनोज विश्वकर्मा (वय 40) यांचा विवाह समारंभात नाचत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लग्नाच्या आनंदाचे क्षणार्धात शोकात रूपांतर झाले.
 
औघडनाथ टाकिया येथील रहिवासी मनोज विश्वकर्मा यांच्या कुटुंबात 25 नोव्हेंबरला लग्न होते. दुपारी मिरवणुकीसाठी कुटुंबात जय्यत तयारी सुरू होती. तत्पूर्वी,  डान्स करताना  मनोजची प्रकृती अचानक बिघडली आणि ते  बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली.

Edited By- Priya Dixit