1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (14:24 IST)

काय सांगता, पोटातून शस्त्रक्रिया करून काढली 187 नाणी

operation
कर्नाटकात एका व्यक्तीच्या पोटातून 187 नाणी काढण्यात आली आहेत. पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी घेऊन ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.  डॉक्टरांनी त्याच्यावर वेगवेगळ्या चाचण्या केल्या. एन्डोस्कोपीही केली. चाचणीत पोटात अनेक नाणी असल्याचे आढळून आले.  यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीच्या पोटातून एक, दोन आणि पाच रुपयांची वेगवेगळी नाणी काढण्यात आली. एकूण 462 रुपये किमतीची  187 नाणी काढण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितले की या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे.
 
 दयमाप्पा हरिजन असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर शहरातील रहिवासी आहे. शनिवार, 26 नोव्हेंबर रोजी दयमाप्पा यांनी पोटदुखीची तक्रार केली. 
त्यांचा मुलगा रवी कुमार त्यांना बागलकोटच्या एचएसके रुग्णालयात घेऊन गेला. येथे डॉक्टरांनी लक्षणांच्या आधारे त्यांची  एक्स-रे आणि एंडोस्कोपी केली. रुग्णाच्या पोटाच्या स्कॅनमध्ये त्याच्या पोटात 1.2 किलो नाणी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दयमप्पाला स्किझोफ्रेनियाचा त्रास असून  त्यांना नाणी गिळण्याची सवय आहे. त्यांनी सांगितले की स्किझोफ्रेनियाचे रुग्ण असामान्यपणे विचार करतात, अनुभवतात आणि वागतात 
रुग्णाने एकूण 187 नाणी गिळली. त्यात 5 रुपयांची 56 नाणी, 2 रुपयांची 51 नाणी आणि 1 रुपयांची 80 नाणी होती. 
 
दयमप्पा यांचा मुलगा म्हणाला, "बाबा निश्चितच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. पण रोजची कामेही करायची. नाणी गिळल्याचे त्याने घरी सांगितले नाही. त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळं आम्हाला त्यांच्या त्रासाबद्दल समजले. त्यांनी एवढी नाणी गिळण्याचे आम्हाला स्कॅन मधून कळले. 
 
शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ईश्वर कलबुर्गी म्हणाले की , रुग्णावर शस्त्रक्रिया करणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. रुग्णाचे पोट फुगले असून नाणी पोटात पसरली होती. ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला सीआरद्वारे नाणी सापडली. नाणी कुठे आहेत ते मी पाहिले. त्यानंतर नाणी बाहेर काढण्यात आली.”  3 डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.
Edited By- Priya Dixit