testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही' घटस्फोटाचे कारण नाही

Last Modified शनिवार, 3 मार्च 2018 (15:28 IST)

माझी पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही, रोज सकाळी लवकर उठत नाही. ती गृहकृत्यदक्ष नसल्याने तिच्यापासून घटस्फोट मिळावा असा अर्ज मुंबईतील एका माणसाने केला होता. मात्र पत्नी चांगला स्वयंपाक करत नाही हे घटस्फोट घेण्याचे कारण असू शकत नाही असे म्हणत मुंबई हायकोर्टाने अर्ज फेटाळला आहे.
न्या. के. के. तातेड आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सांगत घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा म्हणून मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. माझी पत्नी गृहतृत्यदक्ष नाही असे या व्यक्तीने म्हटले होते. मात्र ही वागणूक काही क्रूरता नाही, असे सांगितले. ज्या माणसाने अर्ज केला त्याची पत्नी नोकरी करते. किराणा सामानाचे बिल देणे, पती आणि सासरच्या मंडळींसाठी स्वयंपाक आणि इतर घरगुती कामे ती करत होती. असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नी रुचकर स्वयंपाक करत नाही किंवा सकाळी लवकर उठत नाही हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. कुटुंब न्यायालयात सुरुवातीला हा अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळण्यात आल्यावर या पतीने घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेची त्याचे अपील नाकारण्यात आले.यावर अधिक वाचा :

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine