testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कर्नाटक : ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर आयकर छापा

Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (12:33 IST)

कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर
बुधवारी सकाळी आयकर विभागाने

छापा टाकला. तसंच गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या रिसॉर्टवरही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार रिसॉर्टमध्ये असताना ऊर्जामंत्री डीके शिवकुमार त्यांचे इनचार्ज होते. 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती थांबविण्यासाठी या 44 आमदारांना बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे. ईगलटन रिसॉर्टकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर कारवाई योग्य असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.यावर अधिक वाचा :