testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात

ambedkar
Last Modified शनिवार, 14 एप्रिल 2018 (15:30 IST)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. 1891 साली मध्यप्रदेशातील महूमध्ये त्यांचा जन्म झाला. आज जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. देशात मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळास मुख्यमंत्र्यांची भेट
मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जयंती निमित्त देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Greetings on Ambedkar Jayanti. Pujya Babasaheb gave hope to lakhs of people belonging to the poorest and marginalised sections of society. We remain indebted to him for his efforts towards the making of our Constitution. सभी देशवासियों को अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं। जय भीम!


जळगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ वाजता रेल्वे स्टेशननजीक डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यानजीक ढोलताशांच्या प्रचंड गजरात डॉ.बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली. विविध संघटनांकडून डॉ.बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जामनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीला उत्साहात सुरुवात. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मिरवणुकीत लेझीम खेळून
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
>
लातूर: आज महामानव, भारतरत्न, घटनाकार, उपेक्षितांचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकात भंते पैय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वैशाली बुद्धविहारात सामुहिक बुद्धवंदना करण्यात आले. यानंतर हे भीमसैनिक आंबेडकर पार्ककडे रवाना झाले. याही ठिकाणी भंतेजींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक वंदना केली. यावेळी भंतेजींनी शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. शहरातील एक भाग शिक्षणात पुढे असतो आणि द्सरा भाग मागे असतो हा विरोधाभास नजरेस आणून दिला.>
भीम अॅप वापरकर्त्यांसाठी
कॅशबॅकची ऑफर

भीम अॅप वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर असून आजपासून तुम्हाला कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित हि ऑफर देण्यात आली आहे. या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात 750 रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी 1000 रुपये कॅशबॅक मिळवू शकणार आहेत.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...