शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (09:08 IST)

राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर

Election date
वडणूक आयोगाने राज्सभेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. यातील दहा जागा उत्तर प्रदेश व एक जागा उत्तराखंडमधील आहे. ही निवडणूक 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, मतमोजणी देखील त्याच दिवशी होणार असल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, रविप्रकाश वर्मा आणि राजाराम, भाजपचे हरदीपसिंह पुरी, तर काँग्रेसचे पीएल पुनिया यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. याचबरोबर उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राज बब्बर यांचा देखील कार्यकाळ संपत आहे.