मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (23:26 IST)

आणि एवढे बिल पाहून त्याची झोप उडाली

उत्तराखंड मधील ऋषिकेशच्या एका दुकानदाराला 20 कोटी बिल आल्याने त्याच्या पायाखलची जमीनच सरकली. राकेश कुमार असे या दुकानदाराचे नाव असून तपोवन परिसरातील त्याचे  एक छोटेसे दुकान आहे. एका महिन्याचे एवढे बिल आल्याने त्याची झोपच उडाली आहे.
 
राकेशच्या मोबाईलवर उत्तराखंड वीज महामंडळाचा मेसेज आला. त्यात वीजबिल चक्क 19 कोटी 84 लाख 59 हजार 958 रुपये वाचून तो चक्रावून गेला. राकेशने खात्री करण्यासाठी इंटरनेटवरून वीजबिलाची प्रत काढली. मात्र त्याच्यावर देखील तोच भलामोठा आकडा होता. या प्रकरणी राकेशने वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे असे झाले असल्याची सारवासारव त्यांनी केली. राकेश घरी आल्यावर काही वेळाने त्याच्या मोबाईलवर पुन्हा 1690 रुपये वीजबिल असलेला मेसेज आला. त्यामुळे अखेर त्याचा जीव भांड्यात पडला.