मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:03 IST)

प्रत्येकाने पुढे येऊन बोललं पाहिजे : लेखिका नयनतारा सहगल

Everyone should come forward and talk
प्रत्येकाने पुढे येऊन बोललं पाहिजे, ही काळाची गरज आहे असं वक्तव्य लेखिका नयनतारा सहगल यांनी  केलं आहे. मुंबईत त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.  यासाठी त्यांनी एका गाण्याचंही उदाहरण दिलं. गाणं किती परिणाम साधू शकतं याचं उदाहरण सहगल यांनी दिलं. नया संसार या सिनेमातील गाण्याच्या ओळी काय होत्या ते नयनतारा सहगल यांनी सांगितलं. ‘एक नया संसार बनाये, एक नया संसार, ऐसा इक संसार की जिसमें धरती हो आझाद, की जिसमे जीवन हो आझाद, की जिसमे भारत हो आझाद, जनताका हो राज जगतमें, जनता की सरकार’ या शब्द सेन्सॉरनेही त्यावेळी पास केले होते असे सांगितले. 
 
सध्याचा काळ कठीण आहे, अशा कठीण काळात एक मोठी शांतता हिंदी सिनेसृष्टीत पसरली आहे. कोणताही कलाकार मात्र शांत आहेत, सगळेच शांत आहेत असं नाही. आनंद पटवर्धन यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता. बाकी अनेक कलाकार शांत आहेत याची खंत वाटते असंही नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.