मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भयंकर, मंदिरात आत्महत्या करत फेसबुकवर केले लाइव्ह स्ट्रिमिंग

facebook live suicide from temple in UP
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अचनेरा भागात एका २२ वर्षीय युवकाने त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न होणार असल्याचे सांगत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे या युवकाने एका मंदिरात आत्महत्या करत त्याचे फेसबुकवर लाइव्ह स्ट्रिमिंग केले. 
 
या युवकाने ४ पानांची सूसाइड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे आपल्या कुटुंबियाची माफी मागितली आहे. तसेच त्याने आपले देहदान करण्याची विनंती केली आहे.  आपण आत्महत्या करणार असल्याचे सदर युवकाने आधीच आपले मित्र आणि कुटुंबियाना सांगितले होते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या युवकाच्या मित्रांनी फेसबुकवर ही घटना लाइव्ह पाहिली.आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव श्याम सीकरवार उर्फ राज असे आहे.  ''मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. ती दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करत आहे हे मी सहन करू शकत नाही. तिला गमावलेल्या टेन्शनमध्ये माझी नोकरीही गेली'', असे त्याने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे.