जेव्हा सलमानने माकडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, बघा मजेदार व्हिडिओ  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सलमान कधी पुलमध्ये बॅक फ्लिप मारताना तर कधी आपल्या भाच्यासह मस्ती करताना सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतात.
				  													
						
																							
									  
	 
	आता सलमानला एक नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो बाटलीने माकडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत आहे. सलमानचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
				  				  
	 
	या व्हिडिओत सलमान खानने माकडाकडे पाण्याची बाटली सरकवली, परंतू माकडाने बाटलीला स्पर्श केला आणि सोडून दिली. सलमानने पुन्हा बाटली पुढे केली आणि त्याला पाणी प्यायला म्हटलं, परंतू यंदा माकडाने आपला राग दाखवला. पण जेव्हा सलमानने त्याला एक लहान ग्लासात पाणी दिलं तर माकडाने ते पिऊन घेतलं.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले की 'आमचा बजरंगी भाईजान प्लास्टिकच्या बाटलीने पाणी पीत नाही.' त्याचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय.
				  																								
											
									  
	 
	
	वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर सलमान खान हल्ली दबंग 3 च्या तयारीत आहे.  दबंग 3 व्यतिरिक्त सलमान खान, दिग्दर्शक संजय लीला भंसालीचे चित्रपट इंशाअल्लाह आणि साजिद नाडियाडवालाचा सिनेमा किक मध्ये काम करत आहे.