शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (22:05 IST)

महाराष्ट्रात भाजपचं सरकार न येण्यास फडणवीस स्वतः जबाबदार : संजय राऊत

पणजी/मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा केली आहे. यामध्ये त्यांना भाजप नेते देवेंद्र फडणीस विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत असे वातावरण झालं असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, खरं म्हणजे चित्र कुठे होऊ नये. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे एकमेकांचे व्यक्तिगत शत्रू नाहीत. राजकारणात मतभेद असतात आणि ते लोकशाहीत असायला हवेत. महाराष्ट्रात त्यांचे सरकार आले नाही त्याला मी जबाबदार नाही. त्याला जबाबदार ते स्वतः आहेत. त्यांनी शब्द पाळला नाही त्यामुळे ही सत्ता आली असल्याचे संजय राऊत म्हणाले.
 
गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. गोव्यात शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. यामध्ये फडणवीस आणि मी शत्रू नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत पुढे म्हणाले की, पण आता गोव्यात खरं म्हणजे फडणवीस गोव्याचे प्रभारी आहेत. गोव्यात भाजप हा शिवसेनेपेक्षा मुरलेला पक्ष आहे. आम्ही तिथे धडपड करतो आहोत, आमचा विचार तिथल्या लोकांर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे गोव्यात देवेंद्र फढणवीस यांनी संजय राऊत यांना शिवसेनेचे राजकीय शत्रू मानू नये. आमचा पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला आधिकार आहे. आमच्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. त्या भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ठरवतो, ती संजय राऊतांची व्यक्तिगत भूमिका असल्याचे कारण नाही.
 
शिवसेनेचा मी प्रमुख नेता आहे. पक्षाचे काम करण्यासाठी गोव्यात जातो. माझी लढाई काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, केजरीवालांसोबत लढतो आहोत. त्यांच्याशी उत्तम संबंध असतानाही आम्ही लढतो आहोत, ते आमचे नाव घेत नाहीत. परंतु देवेंद्र फडणवीस हे शिवसेना, संजय राऊत यांना आपले शत्रू का मानतात याचे कारण त्यांना असे वाटत आहे की, गोव्यात जर शिवसेना वाढली आणि रुजली तर भाजपची घट्ट रुजलेली पाळंमुळं आहेत ती कुठेतरी कमकुवत होतील. कारण आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत. गोव्यात आज ज्या प्रकारे माफियांचे राज्य सुरु आहे. ड्रग्ज माफिया, लॅंड माफिया पैशाचा आतोनात वापर सुरु आहे. आता काही दिवसांनी विमाने उतरतील, हेलिकॉप्टर उतरतील ही काय आमची ताकद नाही पैसे वाटायची कदाचित काँग्रेससुद्धा वाटणार नाही. प्रमुख पक्ष कोणता असेल ज्यांच्याकडे पैसे आहे तो सत्तेत असलेला पक्ष आहे. त्याच्यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले आहेत.
 
6. राऊतांनी काँग्रेसला खूश करण्यासाठी ज्ञान पाजळू नये : आ. राम सातपुते
शिवसेनेत जेवढ्या आमदारांची संख्या आहे, त्याहून अधिक दलित बांधव, खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आमच्या जे पोटात, तेच ओठात आहे आणि तेच आमच्या कृतीतही आहे. यामुळे संजय राऊतांनी काँग्रेसला खूश करण्यासाठी आम्हाला ज्ञान पाजळू नये, असा टोला भाजप आमदार राम सातपुते यांनी राऊतांना लगावला आहे. एवढेच नाही, तर तुमच्या पक्षाने किती जणांना प्रतिनिधित्व दिले ते जाहीर करा, असे आव्हानही सातपुते यांनी राऊतांना यावेळी दिले.
 
सातपुते म्हणाले, संजय राऊतांनी काल नेहमी प्रमाणे आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलीत बांधवाचे पाय धुतले, याचा संदर्भ देत टीका केली, भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. पण संजय राऊतांनी दलितांच्या, शोषितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आमचं तुमच्या पक्षासारखा दिखावा आणि देखाव्यासारखं प्रेम नसतं, म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नुसता आदर दाखवण्यापूरता केला नाही, तर समान संधी व प्रतिनिधीत्वाचा हक्क भारतीय जनता पक्षाने खासदार म्हणूनही दिला आहे, असेही सातपुते म्हणाले.