शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (15:53 IST)

कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा

शुक्रवारी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी संसदेत कृषी विधेयके मंजूर झाल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांानी एक दिवसाचा भारत बंदची घोषणा केली. आंदोलन संबंधित प्रत्येक माहिती ... 


11:26 AM, 25th Sep
काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे. दरम्यान, संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत.

10:32 AM, 25th Sep
नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी Farmers Associations देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

10:13 AM, 25th Sep
पंजाब बंदमध्ये 31 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. संसदेत समंत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकामुळे कृषी बाजाराची व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला जात आहे.


10:07 AM, 25th Sep
काँग्रेसकडूनही या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या या विधेयकावर काँग्रेसने पुढील 2 महिने जनआंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. मंगळवारीही पंजाब-हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत या विधेयकाला विरोध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर अनेक रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या. या आंदोलनमुळे 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान विशेष गाड्यांच्या 14 जोड्या धावणार नाहीत, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.