बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (11:41 IST)

'नंदीग्राममधून निवडणूक लढवणं ही ममतांची मोठी चूक'-मोदी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे.
"ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वांत मोठी चूक केली आहे," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ममता बॅनर्जी या दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र त्यांनी हट्टाने नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. तृणमूलमधील त्यांचेच एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनाच भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे.
"ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावं लागेल," असं मोदी म्हणाले.