शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:49 IST)

केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली

नोटा काढण्या साठी आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे देशातील अनेक सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. नागरिकांना आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहेत ही मर्यादा पूर्वी केवळ 20हजार रुपये एवढीच होती. एटीएममधून नागरिकांना आता दिवसाला अडीच हजार रुपये काढता येणार आहेत तर बँकेतून बदलून मिळणा-या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. आता चार हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपयांच्या चलनी नोटा प्रत्येकाला बँकेतून बदलून मिळणार आहेत.
 
अर्थ मंत्रालयानं तसे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या या आदेशामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल आहे. तर शिवाय दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांसाठी बँकेत वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.
1. ऑनलाइन पेमेंट, चेक न स्वीकारणाऱ्या हॉस्पिटल आणि इतर संस्थांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. - वित्तमंत्रालय
2. - पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी नोव्हेंबरऐवजी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. - वित्त मंत्रालय
3. - तसेच जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा 4000 हजार वरून 4 हजार 500 करण्यात आली आहे. - वित्त मंत्रालय
4. - एटीएममधून काढण्याच येणाऱ्या रकमेची मर्यादा दोन हजारांवरून दोन हजार 500 करण्याची सूचना बॅंकांना देण्यात आली आहे. - वित्त मंत्रालय
5. - बॅंकेतून रक्कम काढण्याची मर्यादा आठवड्याला 20 हजार रुपयांवरून 24 हजार करण्यात आली आहे. - वित्त मंत्रालय
6. - एटीएम आणि बॅंकांमधून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची रोकड लोकांनी काढली. - वित्त मंत्रालय
7. पहिल्या चार दिवसांमध्ये 500 आणि एक हजार रुपयांच्या 3 लाख कोटी मूल्याच्या जुन्या नोटा बॅंकांमध्ये जमा झाल्या. - वित्त मंत्रालय
8. - ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बॅंकेत वेगळी व्यवस्था करण्याचे बॅंकांना आदेश - वित्त मंत्रालय