Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई-सुरत इंटरसिटीला प्रथमच महिला टीसी

मंगळवार, 7 मार्च 2017 (15:02 IST)

lady TC

महिला दिनाचे औचित्य साधून पश्‍चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रथमच महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे. 8 मार्चपासून मुंबई-सुरत इंटरसिटी एक्‍स्प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन महिला टीसी म्हणून काम पाहणार आहेत. नीरु वाधवा आणि राधा अय्यर या दोन महिला टीसी मुंबई-सुरत इंटरसिटी एक्‍स्प्रेसच्या फर्स्ट क्‍लासमधील प्रवाशांचे तिकीट तपासणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चपासून त्यांची ही ड्युटी सुरु होणार आहे. आतापर्यंत पश्‍चिम रेल्वेवर उपनगरी लोकल ट्रेन्सच्या महिला कम्पार्टमेंटमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवरच महिला टीसी होत्या. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो यशस्वी ठरल्यास स्लीपर क्‍लास आणि जनरल डब्यातही महिला टीसींची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 20 महिला टीसींची निवड करण्यात आली आहे. दीर्घ अनुभव हा निकष निवडीसाठी ठेवण्यात आला होता. ऑन फील्ड ट्रेनिंगच्या आधी त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. ट्रेनिंग देण्यासाठी 20 महिला टीसींना नोव्हेंबरपासून चार महिने मुंबई-सुरत इंटरसिटीमध्ये पाठवण्यात आले होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

विशाखा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

नवोदित कविंना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे ...

news

केजरीवालांची शुगर वाढली, आता केवळ फलाहार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. राजकारणाव्यतिरिक्त ...

महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर क्राइमचे प्रमाणही झपाट्याने वाढत ...

news

एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात

बँकॉकमध्ये मेदांता हॉस्पिटलच्या एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला आहे. पाच जण एअर ...

Widgets Magazine