Widgets Magazine

चाणक्य माशाने ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली

fish
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे सट्टाबाजार जोरात सुरु झाला आहे. तर पारंपारिक पद्धतीने प्राण्यांच्या मदतीने कौल घेतले जात आहेत. यात चेन्नईतील चाणक्य माशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. तर चीनमध्येही एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प यांना कौल दिला आहे.

माशांच्या टँकमध्ये दोनबाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांचे दोन फोटो व बोटीची छोटी प्रतिकृती होती.
यावेळी चाणक्यला खाद्य घातल्यानंतर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोटीजवळचे खाद्य वेचले. सातवेळा चाणक्यने ट्रम्प यांच्या फोटोजवळच्या खाद्यांची निवड केली. तर चीनमध्येही एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणी केली आहे. या माकडासमोर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटनचे दोन मोठे पोस्टर ठेवण्यात आले होते. त्याने ट्रम्प यांच्या फोटोची निवड केली.


यावर अधिक वाचा :