Widgets Magazine

प्रसिद्ध व्यंगचित्रकार बापू घावरे यांचे निधन

bapu ghavare
प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे (७०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

मोहिनी या दिवाळी अंकात त्यांचे सन १९८९ मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी तेरा हजारांहून अधिक चित्रे काढली. त्याची २० प्रदर्शने पुणे शहरात आणि ५ ग्रामीण भागात झाली आहेत. यातील ठराविक व्यंग्यचित्रांची “लाफिगं क्ल ब’ आणि “हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे “बहुरूपी’ आणि “शिमग्याची सोंगं’ हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.


यावर अधिक वाचा :