बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (14:32 IST)

भारतीय नौदलाला मासेमारी जहाजाची धडक

Indian Navy Day
Goa News : गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे 70 सागरी मैल अंतरावर भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी जहाजाची टक्कर झाली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली असून ते म्हणाले की, गुरुवारी झालेल्या घटनेनंतर भारतीय नौदलाने मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 11 क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले आहे.
 
तसेच नौदलाने बचाव कार्यासाठी सहा जहाजे आणि पाळत ठेवणारी विमाने तैनात केली आहे. “उर्वरित दोघे बेपत्ता असून दोघांचा शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहे,” असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रयत्न वाढवण्यासाठी अतिरिक्त संसाधने या भागात पाठवण्यात आली आहे.'' नौदलाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.

Edited By- Dhanashri Naik