Widgets Magazine
Widgets Magazine

पैशासाठी वृध्दांना करतात वाघाच्या हवाली

tiger621

पीलिभीत- सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना जंगलातील वाघाच्या हवाली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पीलिभीतमध्ये घडत आहे.
 
घरातील व्यक्ती मृत पावल्यास सरकारकडून लाखो रूपये नुकसानभरपाई मिळत असल्याने हा प्रकार घडत असल्याचा संशय वन विभागाच्या अधिकार्‍याने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी 2016 पासून एकट्या माला जंगलात सात घटना घडल्या आहेत. वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्यास सरकार त्या घरातील व्यक्तींना लाखो रूपये नुकसानभरपाईच्या नावाखाली देत आहे. यायाच गैरफायदा काही लोकांकडून घेण्यात येत असल्याचा संशय अधिकार्‍याने व्यक्त केला.
 
वाइल्ड क्राईम कंट्रोल ब्युरो चे केंद्रीय सरकारी एजन्सचीचे कलीम अतहर यांनी याबाबत संशय व्यक्त केला. वाघाच्या ह्ल्लयात मृत्युमुखी पडलेल्या परिसरात जाऊन अतहर यांनी चौकशी केली. प्रत्येक पीडित व्यक्तींची भेट घेऊन नागरिकांची चौकशी केल्यानंतर त्यांना हा संशय आला असून त्यांची आपला संशय अहवालात नमूद केला आहे.
 
1 जुलै रोजी 55 वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व्ही. के. सिंह यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यांना त्यात खरेपणा वाटला नाही. मृत महिलेचा मृतदेह जंगलापासून 1.5 किलोमीटर दूर होता त्यामुळे सिंह यांनी त्या महिलेच्या घरातील व्यक्तीचा नुकसानभरपाई दावा फेटाळून लावला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शहरी भाग महामार्गांमधून वगळण्यात गैर नाही

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या शहरांमधून जाणाऱ्या भागांना लागून असलेली मद्यालये व ...

news

राज्यपालांनी धमकी दिली, दीदी ने केला आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी धमकी ...

news

मिरज दंगल : 51 जणांविरुद्धचा खटला सरकारने मागे घेतला

मिरजेत 2009 मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून दंगल झाली होती. या प्रकरणी 51 ...

news

लग्न नोंदणी आधार कार्डशी जोडा : विधी आयोग

लग्नाची नोंदणी अनिवार्य करण्याची शिफारस विधी आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. sobtch , ...

Widgets Magazine