रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारी चार शहरे देशात

जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या दहा शहरांच्या यादीमध्ये चार भारतीय शहरांचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टॉमटॉमस ट्रॅफिक इंडेक्स या डच कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार भारतामधील बंगळुरू हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर ठरले आहे. 
 
या दहा शहरांच्या यादीमध्ये तळाशी इंडोनेशियामधील जकार्ता हे शहर आहे. जकार्तामध्ये ५३ टक्के वाहतूक कोंडी असल्याचे हा अहवाल सांगतो.  तुर्कीमधील इस्तांबूल शहर या यादीत नवव्या स्थानी आहे. येथे ५५ टक्के वाहतूक कोंडी असते. आठव्या स्थानी पुन्हा एक भारतीय शहर आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये ५६ टक्के वाहतूक कोंडी आहे. समाधानाची बाब म्हणजे दिल्लीतील वाहतूक कोंडी दोन टक्क्यांनी कमी झाली आहे.पेरु देशातील लिमा शहर या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे. लिमामध्ये ५७ टक्के वाहतूक कोंडी असते.
 
रशियामधील मॉस्को हे जगातील सहावे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर आहे. या शहरामध्ये ५९ टक्के वाहतूक कोंडी असते. वर्षभरापूर्वी हाच आकडा ५६ टक्के इतका होता. पाचव्या क्रमांकावर आहे पुणे शहर. पुण्यामध्येही ५९ टक्के वाहतूक कोंडी असते असं हा अहवाल सांगतो. मुंबईच्या तुलनेत ही वाहतूक कोंडी कमी असली तरी जागतिक स्तरावर वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा पाचवा क्रमांक लागतो.चौथ्या क्रमांकावरही भारतीय शहर आहे. चौथ्या क्रमांकावर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईमध्ये ६५ टक्के वाहतूक कोंडी असल्याचे हा अहवाल सांगतो. मागोटा या कोलंबियामधील शहरामध्येही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी असते. हे शहर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असून येथे ६८ टक्के वाहतूक कोंडी असते. या शहरामधील वाहतूक कोंडीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढले आहे. फिलिपिन्समधील मानिला शहर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरामध्येही ७१ टक्के वेळा वाहतूक कोंडी असते.